यूबंटू मधील फाँट प्रॉब्लेम

मी नुकतेच युबंटू वर 'इंडिक' फाँट बसवले पण ते नीट दिसत नाहीत. हिंदी हा शब्द "हनिद.."असा दिसतो. (युबंटू चे व्हर्झन ५.०२). गुगल वर चौकशी केली पण उपयोगी माहिती मिळाली नाही. कुणी यावर प्रकाश टाकून मला मदत करू शकेल काय ?

आपला मदतेच्छू

- गुणा

ता. क. - गुगल वर एवढे कळले की याला "कॅरॅक्टर ऑर्डरिंग प्रॉब्लेम" असे काहीतरी म्हणतात.