पाऊस
थांबतो पाऊस
मनातलं आभाळ रीतं होतांना,
टाळयांचा गजर कानात घेऊन
आपण घरी परततो रीकाम्या खीशांनी.
अंगणात पाऊल ठेवताच
हसरी चेहरे धावत येतात,
सांजवेळ मात्र अस्वस्थ करते
अन शेजारी रडण्याचा आवाज,
दिवस भरचा जमाखर्च आयूष्याचा
घरात ओतून टाकतो.
ऊमटतात भींतीतून ना पसंतीचे स्वर
अन खीडक्यातून पसार होतो
तग धरुन बसलेला आशावाद .
पावसात भीजतांना
त्यालाही अनेक कंगोरे
भीज पाऊस, सरसळणारा पाऊस,
तेव्हा आठवतो घरभर वीस्तारलेला उन्हाळा
चालतांना अधूनमधून जागा होतो,
डोक्यात शेखिचील्ली अन पाऊस.
जगण्याची पावलं मात्र
चिखलात खोलवर रुतलेली,
आपण नीरुत्तर.
कालांतराने जीवघेणा पाऊस
माझे लेखन बंद करतो
आता खोटा प्रतिसाद स्विकारत नाही मन
घरातल्या उन्हाळ्यासहीत पाऊसही शिरतो नसानसात,
अन पून्हा...
पसार झालेला आशावाद
दारा खिडक्यातून भिरभिरतो वाऱ्याबरोबर.