शब्द हे ओठात माझे बोलायचे राहुन गेले
पाय हे वाटेत माझे चालायचे राहुन गेले
प्रेम माझे तुझ्यावर तो अक्षरांचा खेळ होता
हाती गुलाब होते पण द्यायचे राहुन गेले
शब्दात सुर मिसळले सूरही बेसूर झाले
होता हातात बाजा पण गायचे राहुन गेले
करपलेल्या त्या क्षणांची ती जाणीव होती मला
सांत्वनांचे हिशेब ते करायचे राहुन गेले
मरण मी पाहीले माझे पण नाईलाज होता
पेल्यात अम्रुत असुनी प्यायचे राहुन गेले
जिंदगिचे पान माझे राहीले आजन्म कोरे
लेखणी हाती परंतु लिहायचे राहुन गेले
-केदार जोशी