प्रेम आणि द्वेष

प्रिय,
तुझ्या माझ्यावरच्या तात्कालिक प्रेमामुळे
मी कधी फुशारुन गेले नाही
कारण
मला माहीत होतं
ह्या तात्कालिक प्रेमाखाली
माझ्याविषयीचा द्वेष भरलेला आहे
काठोकाठ
तात्कालिक प्रेम ओसरले की
हा द्वेष फणा काढून उभा राहील
तू आणि मी
होरपळून निघू
त्याच्या धगधगत्या आगीत
जसजसा द्वेष बाहेर येईल
तसतशी आपली ओळख एकमेकांना
खऱ्या अर्थाने होत जाईल
तोपर्यंत गरज आहे
एकमेकांना समजावून घेण्याची
सह-अनुभूतीची
आणि प्रिय
हा द्वेषाचा भर ओसरला की
मनाच्या तळाशी
नक्की सापडेल
शुध्द सात्विक प्रेम.... मनशांतीसहित
थांबशील ना तू तोपर्यंत !!!