नातं

सगळीच नाती जगाच्या नजरेतुन बघायची नसतात
मग त्यात आपलं असं काहीच उरत नसतं
तुझं नि माझं नातंहि असच आहे
स्नेहच्या नाजुक धाग्यात गुंफ़लेल
या नात्याला तु नावात गुंतवू नकोस
कारण इथवरच नाती संपत नसतात....
तु माझी कोण ? या प्रश्नाला
जरी उत्तर नसलं तरी
तु माझा आहेस
इतकच पुरेस नाही का?