एका सम्वादानन्तर सार जेव्हा शान्त होत
तेव्हा समजून जाव की पाहिलेल आकाश वेगवेगळ होत
एका सम्वादानन्तर सार जेव्हा शान्त होत,
बदलतात रन्ग पाण्याचे आणि उरात उतरतात काजवे
एका सम्वादानन्तर सार जेव्हा शान्त होत,
ठिणगी चा शोध घ्यावा की हाती धरावा काजवा?
एका सम्वादानन्तर सार जेव्हा शान्त होत,
तेव्हा हेच काही ठरवायच असत
एका सम्वादानन्तर सार जेव्हा शान्त होत,
पाण्यावरच्या बुडबुड्यापेक्शा आतल आभाळच खुणावत असत
अनघा दिघे