दूर दिनप्रभा जशी मावळते

दूर दिनप्रभा जशी मावळते
सांजबावरी लाजत येते, दबकत येते
अंगणात माझ्या हृदयाच्या
स्वप्न दिवे कुणी लावित जाते, लावित जाते


अचानक हृदयात धडधड झाली
अचानक बघा माझी पापणी ओली
कुणीतरी प्रमळ स्पर्शाने
दिसले नाही पण जवळच होते, जवळच होते


कधी कधी हृदयांची भेट ना होते
कधी कधी जुळती रे जन्मांचे नाते
कमाल इतकी मन माझे तरी
परदुःखाने घायाळ होते, घायाळ होते


हृदयात लपलेले गुपितहे खोल
सोनेरी ओढली मी स्वपनांची शाल
ही माझी स्वप्ने, ही माझी आशा
तुटणार नाही माझे सोनेरी नाते,सोनेरी नाते


मूळ गाणेः कहीं दूर जब दिन ढल जाए
गायकः मुकेश
चित्रपटः आनंद
मराठी स्वैर अनुवादः तुषार जोशी, नागपूर