माझं सर्व काही तुचं आहेस,
तुझ्यावीणा मी काही नाही.
तु तर माझ जीवन आहेस,
त्यात तुझ्या शिवाय कोणी नाही.
मी प्रेम तुझ्यावर केलं,
तुला मनापासून आपलं समजून.
पणं तु तर मला म्हणालीसं,
तू मला विसर एक स्वप्न समजूनं.
तिचं ते बोलणे जणू,
पौर्णिमा रात्रीचा चंद्र.
आणि तिचे माझ्यासोबत असणे जणू,
आमवस्या रात्रीचा असलेला चंद्र.
मी तर तुझाच होतो,
तुझ्यावर जीवापाड प्रेम करत होतो.
पण मला काय माहीत मी तुझ्या स्वार्थाच्या डोहात,
डोळे बंद करुन डुंबत होतो.
चंद्र नाही बदलला, सुर्य नाही बदलला,
हा समुद्र नाही बदलला, नाही किनारा बदलला.
पणं, तुझ्या "आई" च्या सांगण्यावरुन,
तुझ मन मात्र बदललं.
"महेश भोसले"