तु गोडी फुलांची

ए फुलों की रानी, ...


तु गोडी फुलांची, वसंताची राणी, तुझे हासणे तर कहर जाहले
हृदय मस्त झाले,मन डोलते गं, तुझे पाहणे तर कहर जाहले


तुझे ओठ म्हणजे, गुलाबी कमळ ते, ही दोन पाने प्रेमाची गीते
या ओठांनी नजुक, नाजुकश्या गोष्टी, मला सांगणे तर कहर जाहले


कधी भेटणे मग, लाजून पळणे, कधी वाट सोडून, हसणे खिदळणे
किती पापण्यांची, उघडझाप करणे, तुझे वागणे तर कहर जाहले


घन दाटती हे, थंडी पसरते, तुझ्या कुंतलांची, कृपाच ठरते
प्रत्येक बट ही, नशेचाच सागर, अडकुन पडणे तर कहर जाहले


मूळ गीतः ए फुलों की रानी
गायकः मुहंमद रफी
चित्रपटः आरजू
लिखकः हसरत जयपुरी