ए सुमनांचे राणी

ए सुमनांचे राणी


ए सुमनांचे राणी, बहरदार कलिके | तुझे स्मितहास्य, कहर जाहले ||
न मन शुद्धीवर, मीही सावध नसे अन् | दृष्टिक्षेपांचे मिलन, कहर जाहले || धृ ||


तुझे ओठ जणू, पद्म कोमल गुलाबी | ह्या दो पाकळ्या, प्रेमकविता जणू त्या ||
आणि त्या पाकळ्यांनी, तव स्नेहार्द्र गूज | मला सांगणे हे, कहर जाहले || १ ||


कधी मुक्त मिलन, कधी ते बावरणे | कधी चालतांना, भटकणे, उसळणे ||
हे भुवयांची महिरप, चढवून उतरणे | उतरून चढविणे, कहर जाहले || २ ||


ही थंडी हवेतील, ही वयातील रात्र | तुझ्या कुंतलांची, कृपा केवढी ही ||
प्रत्येक बट जणू, शत गंधकोशी | तुझे धुंद होणे, कहर जाहले || ३ ||


मराठी अनुवाद: नरेंद्र गोळे २००६०६१६


ऐ फुलों की रानी