हिंदोळा २

का मला तो टाळतो  आहे कधीचा

एवढा का जाच आहे बायकोचा?



तू चवीची का सख्या तक्रार करशी

स्वाद ओठांचा तुझ्या ना मालकीचा



मालकी सखयावरी सांगू कशी मी

नाथ माझा दास आहे बाटलीचा



फार झाले कावळे कर्कश आणिक

सूर भंडांवून गेला कावळीचा



थांब थोडा, एवढी घाई नको रे

लागला डोळा कुठे त्या थेरडीचा?



व्हा उभे खिडकीतळी अन् शीळ घाला

दर्शनार्थी जो असे त्या सायलीचा







संदर्भ - हिंदोळा http://www.manogat.com/node/6503