दुःख जे मनात होते ना कधी कोणास सांगितले..
चार शब्द जे आतून आले वाकडे बोल कविता झाले..
ना कुठला छंद त्याला ना कुठला अलंकार..
स्वच्छ हळव्या भावनाच ज्यांचे आकार अन ऊकार..
जिला हे सर्व सांगायचे तिनेच सोडले वाऱ्यावर अवेळी..
त्रास साहुनी ऐकुनी घेता जरी..
आपल्याचसाठी ह्या "धन्यवादा " च्या चार ओळी