मला ती मुलगी
खूप आवडली
तिश्या हसण्याने
सहज भुरळ पडली
तिच्याकडे पाहून
खूप प्रसन्न वाटतं
तिच्या प्रत्येक नजरेत
अहाहा! पारणंच फिटतं
मला कालचा चंद्रही
खूप आवडला होता
आकाशातून मनातच
जणू उतरला होता
चंद्राबद्दल नेहमीच
मला कौतुक वाटतं
कधीही बघा त्याचं असणं
मनात साठतं
मी चंद्राला कधीच
नातं मागत नाही
पण माझं त्याचं नातं आहेच
आस्वादाचं, कौतुकाचं
मनमोहक, आशादायी
ती मुलगी मला आवडते
तो चंद्रही आवडतो
मी पुन्हा पुन्हा त्यांच्यावरती
असाच भाळतो
मी दोघांशीही
सौंदर्याचं नातं पाळतो
मी दोघांशीही
सौंदर्याचं नातं पाळतो
तुषार जोशी, नागपूर
Sky is not the limit, it is a door to Galaxy...