जगात काही गोष्टी या संपूर्ण मानवजातीसाठी
लागू आहेत. आफ्रिका असो वा भारत, काही गोष्टी या विश्वव्यापक असतात.
त्यापैकीच ही एक. ही रचना आणि आशय फार गांभीर्याने घेऊ नये ही
विनंती. जगातील समस्त प्रियकरांची आणि प्रेयसींची (प्रेयस्यांची?) क्षमा
मागून
आफ्रिकन माणसाची प्रेयसी
जगात सर्वात भीतीदायक स्त्री असते
त्याच्यासाठी
जशी माझी प्रेयसी भीतीदायक आहे
माझ्यासाठी
भीतीची ही विश्वव्यापकता
नेहमीच सलत आलीय माझ्या
हृदयात
खरेच भीती का बसली असते
प्रत्येक प्रियकराच्या
मनात?
मला कितीही भीती वाटली
तरीही मी आजकाल टाळतो
बोलायचे
कदाचित इतरांना ती
प्रेमळ आणि सालस दिसत
असायची
प्रेरणा - आफ्रिकन माणसाची प्रेयसी