अदभुत सत्य कथा (भाग २)

भाग १ वरून पुढे..

गुरूमहाराजानीं कसल्या ही प्रकारच्या पेश्याची, मदतीची किंवा इतर गोष्टींची अपेक्षा केली नाही. त्यांची भेट ३ - ४ वेळा झाली. त्यांनी 'माझ्यात हि शक्ती  आहे', किंवा 'मी हा चमत्कार करून दाखवतो' असे कधी ही सांगितले नाही.

मला त्यांच्यात कसली आसक्ती जाणवली नाही.

त्यांच्या बद्दल मला बरोबर माहिती योग्यत्या शब्दात विचारण्याचा त्रास फार कमी जणांनी घेतला.

गुरूमहाराज हे ढोंगी आहेत, हे बऱ्याच जणांनी नुसत्या माझ्या एका अनुभव लेखनांवरून तर्काने जाणले!

तुम्ही कोणी त्यांना पाहिले नाही, ते कोण आहेत, कुठे आहेत, नाव - गाव काय.. काही माहिती नाही.

पण मला विरोध करताना असा आव आणला जातो, की तुम्हाला १००% माहिती आहे की ते ढोंगी आहेत!

मला ह्या पोकळ वादात किंवा टवळी करण्यात रसवाटत नाही.
आणि ह्या लोकांनी माझ्या कडूनं त्या संत माणसाचा पत्ता घेऊन त्यांना त्रास देण्याचा विचार फक्त स्वप्नातच करावा.

हा विषय वादा करता केला नाही. आपल्याला अनुभव असल्यास सांगावा (जरुरती माहिती गोपनीय ठेवायला हरकत नाही.)

येथे सत्य कथन अपेक्षीत आहे

कृपया वाद टाळावा.