ब्लौग वर बंदी..?

मंडळी,
आज दोन दिवस झाले मी माझाच ब्लौग - [नोंद / लिखाण करण्याचे संकेतस्थळ] मी मराठी पाहू शकत नव्हतो. कारण काय तर त्यावर बंदी आहे. आता ही बंदी कोणी घातली याचे कारण - खरे कारण सापडले नाही. यासारखे अनेल ब्लौग आज बंद आहेत, कीमान दिसत तरी नाहीत.

पर्यायी,  मी मराठी आहे..!

मला वाटते, येथे बरेच असतील ज्यांना ही अडचण असेल. या वरील उपाय खाली दिलेल्या संकेस्थळावर आहे. ज्यांचे ब्लौग ब्लौगर वर असतील त्यांनी http://www.inblogs.net/ब्लौगचे-नाव असे लिहावे.

अधिक माहिती येथे आहे - http://www.inblogs.net/

आभार,
सर्जा