एकदा विमानात...

एकदा विमानात
शिरला उंदीर
तरी प्रवाशांनी
धरला धीर;
त्याच्यामागून
साप शिरला,
तेव्हा सगळ्यांना
घाम फुटला.
पण दोघांनीही
विमानातून
टाकल्या उड्या
धडाडधूम्
कारण त्यांनी
केबिनवरची
वाचली पाटी
'कॅप्टन गरूड' !

- अज्ञात.