माझं दुःख
घट्ट दाबुन धरले मी
प्रयत्नपुर्वक
जाणिवपुर्वक
पण...
प्रत्येकवेळी
आलं कुणीतरी
माझ्यावरच्या प्रेमापोटी
किंवा सहानुभुती ही जगाची रित म्हणुनही
माझी जखम मात्र
पुन्हा ओली झाली
त्यांचा हात पाठीवर पडल्यावर
आणि
शब्द कानावर
आणि मग
पुन्हा प्रयत्न सुरु
ती दाबुन धरायचे
ती भळभळतेय हे
स्वःताला सुद्धा कळु नये म्हणुन.