तेच माणुस आपले असते...

शब्द असोत ,सम्भाळुन श्वासामधे राखलेले


असोत अथवा माळावरच्या मातिमधे माखलेले


सन्दर्भावर आपणहुन त्यानि अर्थ पेरत जावा


मनामधल्या फ़ुलपाखराला मुक्ततेचा पन्ख द्यावा


 


ज्याच्यासाठी ह्रुदयामधे एक गाणे जपले असते...तेच माणुस आपले असते...


 


सहवासात ज्याच्या आपण वजाबाकी विसरुन जातो


आयुश्याच्या पाकळीवर्ती दवासारखे पसरुन जातो


डोळ्यात ज्याचे प्रतिबिम्ब दिवसरात्र नाचत असते


देण्यासारखे बरेच काहि मनामधे साचत असते...


 


ज्याच्यासाठी नाजुक काळिज वेदना होवुन दुखले असते...


तेच माणुस आपले असते...


 


भुमिका ठाकुर


( विशेश सहाय्य - भुशण प्रभु )