आठवतात सखे तुला
आठवतात सखे तुला
ते गंध-भारले क्षण?
'कस्तुरी' झालेले तन आणि मन!
दीर्घ तुझ्या नयनांचे सागर,
अन तन्मयतेचा मोह अनावर?
मुक्त तुझा तो केश-संभार,
नि गजऱ्याचा गंध मत्त अनिवार!
कानात झुलणारी ती कर्ण-फुले,
नि हृदयात जो गोड काटा सले!
रक्तिम अधरांची ती थरथर,
नि मधाळतेचे डोह अनावर?
..आठवतात सखे तुला?
-मानस६