स्वप्नांतला राजकुमार..

स्वप्नांतला राजकुमार
स्वप्नांतच पाहिलेला बरा..
स्वप्नांतच राहिलेला बरा..
दिवसाच्या उजेडात आलाच कधी
तर लक्षात येतं,
घोडं कागदी आहे..
मुकुट बेगडी..
आणि ते जे काही बलदंड वगैरे वाटलं होतं
तो चिलखताचा आकार आहे..

आत ' माणूस' नाहीच आहे....