खेळ

खेळ


मी हा खेळ मांडीयेला


रंग शिंपल्या शोधण्याचा


एक शिंपली प्रेमाची अन


एक शिंपली मैत्रीची....


एक शिंपली त्यागाची अन


एक शिंपली मोहाची....


प्रेम कसले,मैत्री कसली


कुठला त्याग न मोह कशाचा


विरणाऱ्या या उडणाऱ्या या


रंगबाहुल्या नटवायाच्या........


का या प्रेमी अंध व्हावे


का मैत्रीने धुंद व्हावे


का त्यागाची महती गावी


का मोहाला बळी पडावे...


जीव एकला जगती यावा


एकलाच तो क्रमाक्रमावा


मागे वळूनी साद घालण्या


हिशोब फ़सवा का सुधरावा 


दिले घेतले सारे विसरा


कितीदा रडलो सारे विसरा


एकलकोंड्या या जीण्याची


खुणगाठ ही कधी न विसरा


कृतार्थ माना संगत सोबत


दोन घडीची आहे फ़सगत


कुणी कुणाचा भार न सोसे


कुणी कुणाचा भोग न भोगे


मी हा खेळ मांडियेला


रंग शिंपल्या शोधण्याचा


एक शिंपला "मोती"भरला


एक शिंपला"माती"भरला...........


शीला.