भीती

आतल्या आत पिचून चाललय


संपत चाललय काहितरी...


व्यर्थय प्रयत्न चेतवण्याचा..


विझत चाललय काहितरी...


 


स्वप्ने संपली उरली प्रेते


आणि इच्छांची काहि भूते..


खूप काही मिळवताना..


हरवत चाललय काहितरी...


 


तत्वे, नीती, संस्कारांचं,


घाबरवणारं कोंडाळं..


आतल्याआत भीती बनून,


थिजत चाललय काहितरी...


 


दचकवते चाहूल उद्याची,


अन कालच्या आठवणी काही..


अस्तित्वाची राख बनून,


उरत चाललय काहितरी...


 


-मुरारी