रात्र चांदण्यांची

पदराआडचा चेहरा जरा हासला होता
चंद्रमा तो नभांमागचा मला भासला होता.


असा माळलास तू अता गजरा हा मोगऱ्याचा
जसा तारकापुंजच मला नभांत दिसला होता.


सुवासात मोगऱ्याच्या बहुतेक जादू असावी
गेलो विसरून सारा, जो विरह सोसला होता.


झालो घायाळ आता तुझ्याच ह्या कटाक्षाने
जणू नजरेचा तो बाण हृदयात घुसला होता.


चांदण्या रात्रीतल्या अशा धुंदीत मात्र मजला
त्या गूढ मारव्याचा जसा सुर गवसला होता.


अजय