गड्या तुझी सय येई, मन सैरभैर होई
क्षण एकही रे पुढे, मग सरकत नाई
सरसर सर येता, आणी तगमग होई
पायातल्या बेडीचा रे, भार मणमण होई
मनी कल्लोळ कल्लोळ, पाणावली माझी दिठि
सुटता ना सुटे तुझ्या, आठवांची मगरमिठी
एक थेंब पानाआड, एक पापणीच्याआड
कोसळण्या आतुरले, माझ्या मनीचे आभाळ
दिशा झाकोळ झाकोळ, हवा ढगाळ ढगाळ
गड्या पावसा रे, आता तु तरी कोसळ
तु तरी कोसळ....