आश्वासने नव्याने देऊन राव गेला
नवा दलाल नुकता ठरवुन भाव गेला
आलीच वेळ नक्की पुन्हा निवडणुकीची
आताच एक नेता वाटुन पाव गेला
दिन आजचा सणाचा दारात येई नेता
पाच वर्षात त्याला विसरुन गाव गेला
अबब इतके पाणि आले कसे नळाला
पेटता दिवेही उजळुन गाव गेला
"अमृत" वाटण्या त्यांनी थाटता दुकाने
करण्यास दुःख हलके मोठा जमाव गेला
हझल म्हणता येईल ?
मन्नु