तुझ्या हातात सारे स्वप्नपक्षी नि मोरपिसे
आनी हातात माझ्या डमरू नि मुंगुसे
तुझ्या हातात सारे तरल व मखमली
आनी हातात माझ्या खिळे नि करवती
तुझ्या हातात सारे आदर्श व उच्चसंस्कार
आनी हातात माझ्या वास्तव नि सोपस्कार
तुझ्या हातात सारे सारे नभांगण
आनी हातात माझ्या तुटता तारा
तुझ्या हातात सारे कला नि कौशल्य
आनी हातात माझ्या छिन्नी, हातोडा नि शल्य
तुझ्या हातात सारे ओसंडणारा लक्ष्मी विलास
आनी हातात माझ्या अदृष्टाचा अपुरा घास
तुझ्या हातात सारे शब्दसामर्थ्याचे
आनी मनात माझ्या भय शब्द-जखमेचे
तुझ्या हातात सारे शंख नि शिंपले
आनी हातात माझ्या वाळू ओले ओले
......प्ण मीही प्रार्थितो 'हे असेच असावे
प्राक्तन तुझे तुझ्या हातात सारे, असावे
आनी हातात माझ्या असू दे वास्तव-
- रुक्षपना- अवहेलना- घुसमट
हे तर माझेच सारे