उखाणे

सध्या मागे पडत चाललेल्या पण अजुनहि लग्न, डोहाळेजेवण,बारसं सारख्या कार्यक्रमांमधे आपली जागा कायम ठेवलेल्या "उखाण्यां"विषायी लिहिते आहे.


माझ्या वाचनात, ऐकण्यात आलेले काही निवडक उखाणेः-


ग्रुहप्रवेशाच्या वेळीः-


१.नव्या वाटा, नव्या दीशा, नव्या घरातपदार्पण ,  


(सासरचं आडनाव) ची झाले सून आता (नवरा नाव)ला केलयं सर्वस्व आर्पण.


२.(सासरचं आडनाव) आणि (माहेरचं आडनाव) झाले एक , दुधात पडली साखर,


(नवरा नाव) - (नवरी नाव) च्या संसारावर राहो सर्वांच्या मायेची पाखर.


पूजेच्या वेळीः-


सत्यनारायणाची केली मी मनोभावे पूजा,


(नवरा नाव) साठी मागितलं सुखं, आता आशिर्वाद नको दुजा.


घास देतानाः-


१.विवाहाचा सोहोळा कसा थाटामाटाचा, आनंदाचा आणि उत्तम भोजनाचा,


(नवरा नाव) चं नाव घेऊन मान राखते अन्नपूर्णेचा.


२. (पक्वान्न) आहे फारच गोड, भजी लागतील तिखट,


(नवरा नाव) ला घास कसला बरं द्यावा , प्रश्न पडलाय बिकट.


डोहाळेजेवणाच्या वेळीः-


रवीच्या अस्ता नंतर रजनी टाकते पाऊल,


(नवरा-बायकोचं नाव) च्या संसारात बाळराजाची चाहुल.


बारशाच्या वेळीः-


दरवळला सुगंध, उमलल्या जाई-जुई,


(नवरा नाव) चं नाव घेते (बाळाचं नाव) ची आई.