मराठी विकिपीडिया

विकिपीडिया हा विकिपीडिया वाचकांनीच एकत्रित पणे internet वर संपादित केलेला मुक्‍त ज्ञानकोश आहे. हे विकी वेबपेज आहे ज्याचा अर्थ कुणीही (अगदी तुम्ही सुद्धा,) ह्या वेबपेजची बहुतेक पाने/लेख -अगदी हे पान सुद्धा- वर 'संपादन' लिहिलेल्या कळीवर टिचकी मारुन संपादन सुरु करु शकता.


प्रसिद्ध मराठी संत समर्थ रामदास म्हणतात आपणासी जे जे ठावें, ते दुसऱयांसी सांगावे, शहाणे करूनी सोडावे, सकलजन. मराठी विकिपिडीयासाठीच जणू त्यांनी हे लिहून ठेवले होते! बिनधास्त पणे आपल्यास अवगत असलेल्या ज्ञानाचा परिचय लाभ स्वयंसेवी सहकारी पद्धतीने internet आणि विकीपिडीया वापरुन करुन द्या आणी त्यांचे हे वचन अमलात आणा.


http://mr.wikipedia.org/wiki/ या संकेत स्थळास अवश्य भेट द्या.