श्रीगुरुजी जन्मशताब्दीनिमित्त परिसंवाद

मुंबई, ता. २ - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक श्रीगुरुजी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त रविवारी (ता. ६) "आधुनिक संदर्भात हिंदुत्व' या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. हा परिसंवाद गोरेगाव येथील अ. भि. गोरेगावकर विद्यालयाच्या गोविंद दळवी सभागृहात सकाळी ९.३० वाजता होणार आहे. या परिसंवादाचे बीजभाषण रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक विनय सहस्रबुद्धे करणार असून रा. स्व. संघाचे पश्‍चिम क्षेत्र संघचालक अशोक कुकडे समारोप करणार आहेत. परिसंवादात "अंतर्नाद' मासिकाचे संपादक भानू काळे, पुणे विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागाचे प्रमुख सदानंद मोरे व "सकाळ' दैनिकाचे सहव्यवस्थापकीय संपादक (मल्टिमीडिया) संजीव लाटकर सहभाग घेणार आहेत.