Mary had a little lamb चं स्वैर भाषांतर ...
शांतेच्या घरी एक कोकरू होतं,
कोकरू होतं, कोकरू होतं,
शांतेच्या घरी एक कोकरू होतं,
पांढरं पांढरं छान
आणि शांऽता जाईल तिथे ते,
तिथे ते, तिथे ते,
आणि शांऽता जाईल तिथे ते,
जाई विसरून भान
शांतेच्या मागे गेलं शाळेत ते,
शाळेत ते, शाळेत ते,
शांतेच्या मागे गेलं शाळेत ते,
त्यामुळे नीयम तुटला
आणि पोरंऽ लागली खिदळायला,
खिदळायला, खिदळायला,
आणि पोरंऽ लागली खिदळायला,
पाहुन शाळेत कोकराला
मास्तरांनी दिलं त्याला हाकलुन पण,
हाकलुन पण, हाकलुन पण,
मास्तरांनी दिलं त्याला हाकलुन पण,
रेंऽगाळलं कोपऱ्यावर
आणि शांऽतपणे ते ऊभारलं,
ऊभारलं, ऊभारलं,
आणि शांऽतपणे ते ऊभारलं,
शांता येईस्तोवर
शांता इतकी त्याला आवडते का,
आवडते का, आवडते का,
शांता इतकी त्याला आवडते का,
म्हणाऽलि सारी मुले
कारण शांऽताला ते खुप आवडतंऽ,
आवडतंऽ, आवडतंऽ
कारण शांऽताला ते खुप आवडतंऽ,
मास्तर सांगते झाले