मिश्किल उखाणे

माझ्या वाचनात आलेले काही मिश्किल उखाणे लिहित आहे.


१. सुंदर सुंदर हरणाचे वाकडे तिकडे पाय,


    आमचे हे अजुन आले नाहीत, कुठे गटारात पडले की काय?


२.चांदीच्या ताटात जिलबीचे तुकडे ,


   घास देते मेल्या थोबाड कर इकडे.


३.देवळाच्या देव्हाऱ्यात लावतात वाती,


 आमचे हे गेले वरती आणि मी राहिले खालती.


४.मानसिक रुग्णाला इंग्रजीत म्हणतात "सायको",


  रामरावांच नाव घेते शामरावांची बायको.


५.कोपऱ्यातल्या गोणीत आहेत पसाभर गहू,


   लग्न नाही झालं अजुन, मग नाव कोणाचं घेऊ?