फ़रक एव्हढासाच असे

उचकी लागून जागा, आठव कुणी काढली?



 पापपुण्याची वही "ती" अवचित  मज दाविली


'चल आता,'यमदूत वदे 'केली मी लास्ट एंट्री


स्वर्ग /नरक ठरवणार सगळ्या तुझ्या त्या एंट्री


त्यात काही बदल नाही; नो ऍड्जस्टमेंट रे
नो डिस्क्लोजर हा आदेश यमाचाच आहे की रे


दरबारी यमाच्या दाद या सी इ ओ ची कुणी  न घे
 यमास माझ्या या  एंट्रीची  वर्दी रिसेप्शनिस्ट ही न दे


तिष्ठलो, मी  कल्लाक किती ते नोंद नाहीच त्याची रे

शेवटी 'सांगा, मी आहे इथे' वदलो जोरात की रे


नो डिस्क्लोजर  कां? विचारी यम चित्रगुप्तास हे
कुजबुजे कानात तो ही  यमास ही पटले की ते


तत्क्षणी त्याने दूतास काही मागणे फ़र्मावले


सोनाराच्या तागडीने यमही पापपुण्य तोलतसे


'गवसले, याचे स्थान' आनंदे यम वदतसे 
फ़िफ़्टी फ़िफ़्टी पाप पुण्य  बॅलन्स भासे शून्यसे


गण याचा मनुष्य आहे देव वा राक्षस नसे


मनुष्यातच जाऊ दे तडफ़डू दे तिथे; नाहितरी


नरक आणिक पृथ्वी फ़रक एव्हढासाच असे


 


पी चंद्रा