लंडनची बातमीपत्रे-एका शतकानंतर! भाग १

स्वातंत्रवीर सावरकरांच्या जीवनातला कुठला कालखंड हा जास्त प्रभावी व तेजोमय आहे हे ठरवणे तसे अवघडच.  तरी त्यांच्या तरुणपणाचा कालखंड आजच्या तरुणांपुढे यावा असं वाटल्यामुळे १९०५ - १९१० पर्यंतचं लंडनमधील वास्तव्य ही या लेखाची मर्यादा ठेवलि आहे.या कालखंडाची निवड करताना  वाचकानी मूळ सावरकर वाङमय वाचण्यास उद्युक्त व्हावे हा हेतू.


लंडनची बातमीपत्रे वाचावयास घेतल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. ती म्हणजे  ओघवती भाषा. सद्यस्थितीचे वर्णन इतकेच त्याचे स्वरुप नाही तर हिंदुस्तानात, लंडनमधील भारतीय तरुण करीत असलेल्या चलवळीचे व इतर घटनांचे यथायोग्य वर्णन करावे व विकृत व अयोग्य वृत्ताचे खंडन करावे हा दुहेरी हेतू दिसतो. २५व्या वर्षी तरुणात मिसळून त्यांचा पक्ष मांडण्याची वृत्ती सहजच म्हणता येईल. त्यांच्या अनेक पत्रात ती दिसून येते. २८ सप्टे. १९०६ च्या राष्ट्रीय तरुण सेना या पत्रात ते बाहेरुन चकचकीत दिसत असलं तरी ब्रिटिश सम्राज्यात कायदा व सुव्यवस्था वाईट आहे असे सांगतात. त्याच बरोबर लॉर्ड रॉबर्टचे लष्करी शिक्षण लहान वयापासून सक्तीचे करावे हे म्हणणे ते उचलून धरतात. या जगात नेभळ्यांचा निभाव लागणार नाही असे प्रतिपादन करतात. दुसऱ्या महा युद्धाच्या वेळी सैनिकीकरणावर भर देण्याचे 'मूळ' हेच तर नसेल ?


समाप्तीचा प्रारंभ या पत्रात ते १८५७च्या स्वर्णजयंतीच्या वेळी झालेले उद्रेक व ब्रिटिशांची भयदर्शक धांदल याचं यथेच्छ वर्णन करतात‌. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यानी स्वतःच्या राज्यरोहणाचा सोहळा घडवून ब्रिटिशंच्या पोटात कसा


गोळा आणला ते वर्णिले आहे. २०-१२-०६ च्या क्रांतीचा प्रवाह या पत्रात जगभरातील क्रांत्यांचा परामर्श घेतला आहे. स्वदेशाशी कृतघ्नपणा  या १२ एप्रिल १९०७


च्या पत्रात त्यानी स्वदेशाचा तिरस्कार व परदेशातील ऐषाराम कवटाळणाऱ्यांची हजेरी घेतली आहे. लंडनमधील पहिला शिवोत्सव(शिवजयंती उत्सव) या २९ मे १९०८ च्या पत्रात अनेक देश हितकारक उत्सवांविषयी व साजरा झालेल्या शिवोत्सवविषयी वर्णन केले आहे. लोकमान्यानी १८९३ मध्ये रोवलेल्या बीजच्या एका फ़ांदीचे रोपण थेट


लंडन मधे!!!!! लोकमान्याना काळ्या पाण्याची शिक्षा  या


२१ सप्ट.१९०८ च्या पत्रात नामदार गोखलेंच्या वर्तनाने आलेली उद्विग्नता मूर्तीमंत उभी केली आहे.


द्वंदयुद्ध व शिविगाळीचा परिणाम या अनुक्रमे २६ फ़ेब्रु.१९०९ व ५ मार्च १९०९ च्या पत्रात 'सुवरका बच्चा'


ला प्रतिटोला वासुदेव भट्टाचार्य यानी सर ली वार्नरना कसा दिला याचे विस्तृत वर्णन आहे. सर कर्झन वायलीस ठर मारले या ३० जुलै१९०९ व मदनलाल डिंगरा या ६ ऑगस्ट १९०९ या पत्रात मदनलाल च्या बलिदानाचे व खटल्याचे रोमांचकारी वर्णन आहे.  


 


पी चंद्रा


'कान्हेरी'च्या सौजन्याने