कालाय तस्मै नमः

ज्या ब्रिटीशांनी पाकिस्तान तयार केला, ज्या अमेरिकेने पाकिस्तानच्या काळ्या कारवायांवर कानाडोळा केला, त्यांना त्याच पाकिस्तानातील लोक हैराण करत आहेत. अमेरिकेतील बुद्धीवादीपण पाकिस्तानबद्द्ल जरा सहानभूतीने विचार करणारे असायचे... आता अशाच एका पण अमेरिकन रिपब्लिकन गटाशी जवळीक असणाऱ्या आकाशवाणी केंद्रावरील एक वक्ता म्हणाला, "तुम्हाला अतिरोकी हवेत मग 'या लोकांना' आपल्या देशात स्थान द्या, त्यांना शिकवा, मध्यम वर्गिय करा आणि बघा कसे (कृतघ्नपणे) ते आपल्या विरोधात अतिरेकी कारवाया करतिल.."


तुम्हाला काय वाटते? ह्यालाच काळाचा न्याय म्हणतात का?


आपण सरकार म्हणून नाही तरी समाज म्हणून यातून काही शिकणार आहोत का?