पाजी नज्म

पाजी नज्म म्हणजे काय?
पाजी नज्म - कवी गुलज़ार यांनी त्यांच्या काही कवितांना दिलेले गमतीदार आणि खट्याळ नाव आहे.  ते म्हणतात की जसे मी माझ्या काही खास जवळच्या मित्रांना सहज "पाजी" म्हणतो, "चल हट पाजी" असे म्हणतो तसेच आहेत या कविता.  या कविता बिनधास्त आहेत, बरेच दा त्या मला वाकुली दाखवतात, आयुष्यातला एखादा छोटासा अनुभव जपून ठेवतात.

माहिती चा स्रोत
याहू गटांमध्ये गुलज़ार यांच्या चाहत्यांचा एक गट आहे.  त्यात गुलज़ार बरोबर राहिलेले, गुलज़ार ला जवळून ओळखणारे, त्यांचे नवे जुने बरेच चाहते आहेत.  त्या गटात ज्या चर्चा होतात त्या चर्चांमध्ये समजलेली ही माहिती आहे.

गुलज़ार म्हणतात, "कहते हैं, कीचड़ पर पत्थर मारो तो अपने ही मुंह पर आता है
मैने तो यही सोचकर मारा था, मगर कुछ छींटे दूसरॊं के मुंह पर भी जा पड़े
कान पकड़ के माफी मांग ली ये सब 'करो और कान पकड़ लो' वाली नज़्में हैं
पाजी इसलिये कि अकसर गुद्दी पर धप से पड़ती है और 'धत! पाजी' की आवाज़ आती है"

अहा जिंदगी मासिक
भास्कर नावाचा एक गट आहे तो "अहा जिंदगी" नावाचे एक मासिक प्रकाशित करतो.  त्या मासिकात गुलज़ार च्या या कविता प्रकाशित होत असतात.  "पाजी नज्मे" नावाचे पुस्तक काढण्याचा गुलजार यांचा मानस आहे.  लवकरच आपल्याला हे पुस्तक वाचायला मिळेल.

पाजी नज्म चे उदाहरण
मला गुलज़ार ची कविता आवडते ते त्याच्या तरल आणि भावस्पर्शी शब्दांमुळे.  "इस हस्पताल मे" ही त्यांची पाजी नज्म वाचताना मला लगेच "वपुंचा" देवाला एक्नालेजमेंट देणारा नायक आठवला.  ही कविता मी इथे मराठीत सादर करण्याचा प्रयत्न केला आहे.  जेव्हा गुलज़ार म्हणतो देवा इथे सगळं आहे त्यामुळे तशी तुझी गरज नाहीये तेंव्हा एकदम आयुष्याचे नाशिवंत असणे डोळ्यासमोर येते.  मग त्यांच्या, देवाला, जरा वेळ असेल तर ये बस, थोड्या गप्पा करू म्हणण्यात त्यांची मिश्किल शैली जाणवते.

गुलजार चा आणिक एक पंखा
तुषार जोशी, नागपूर