या हॉस्पिट्ल मधे - गुलज़ार

मूळ कविताः इस हस्पताल में
कवीः गुलजार
प्रकाशनः अहा जिंदगी (जुलै २००६)
मराठी सादरीकरणः तुषार जोशी, नागपूर



या हास्पिट्ल मध्ये,
सगळं काही आहे, आणि तरबेज डॉक्टर्स पण आहेत,
श्वास यंत्राच्या साह्याने चालतात,
आणि बाटलीमध्ये रक्त पण मिळते आहेच
"लिवर" पण माफक भावात मिळताय इथे
डोळे बदलायला डोळ्यांच्या बँका आहेत.

देवा, मी "बायपास सर्जरी" करतोय रे
डॉक्टर फ्रेज़र निष्णात आहेत
तशी तुझी गरज नाही आहे, पण
जर वेळ असेल, तर ये ना, जवळ बस
थोड्या गप्पा करूया.

- गुलज़ार