मनोगत - मनोगती - मनाची गती

मनोगत म्हणजे जरी 'मनातील गोष्ट' असे असले, तरी त्या शब्दाच्या 'मनोगती' या शब्दाशी असलेल्या उच्चारसाधर्म्यामुळे तो शब्द ऐकला की मला नेहेमी भीमरूपीतील ओळ आठवते ...


मनासी टाकिले मागे गतीसी तुलना नसे


... आणि त्यामुळे मी नेहेमी अजाणतेपणे मनोगताचा गतिमानतेशी कुठेतरी संबंध जोडतो.


आज मनोगतवर आलो. पाहिलं तर सगळी पाने जरा जीवावर आल्यासारखी साऽवकाश येत होती. असं का बरं ? मनात म्हटलं सगळ्यांची मनोगते ऐकून सर्व्हर कदाचित् कंटाळला असेल ...


क्षमा करा, मनात आलं ते आपलं उगीच लिहिलं. 'मनोगत' वर असे (फालतू) लिहिणे प्रचलित नसेल किंवा योग्य मानले जात नसेल तर सांगा.