स्वातंत्र्यवीर सावरकर - एक अग्रणी भाग ३

*राजकीय कारणांसाठी २ जन्मठेपेची म्हणजे ५० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावलेला एकमेव देशभक्त


*कारावासात लेखणी अथवा कागद उपलब्ध नसताना तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्य लिहून वेद्कालीन वाच्यपठण पद्धतीप्रमाणे सुमारे दहा हजार काव्यपंक्ति मुखोद्गत करवून आणि त्या तुरुंगाबाहेर पाठवून काव्यनिर्मिती करणारा जगातील एकमेव कवी


*जर्मनीतील स्टुट्गार्ड येथे २२/६/१९०७ रोजी झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत मादाम कामा यानी फ़डकवलेल्या भारतीय राष्ट्रध्वजाचा निर्माता


*पूर्वास्पृश्योद्धारासाठी रत्नागिरी येथे, सर्व हिंदुना खुले असणारे, पतितपावन मंदिर निर्मिणारा पहिला समाजसुधारक


*मराठी साहित्य परिषदेचे पहिले अध्यक्षपद भूषवलेली व्यक्ती


* शीख समुदायाने गौरविलेला एकमेव हिंदू पुढारी


 


ःपतित्पावन मंदिर संस्था, रत्नागिरी 


 


             .........‌समाप्त.....


 


चंद्र परांजपे