एक प्रवासवर्णन आमचेही!!!

छ्याः आजकाल मुंबईतून पळून जावेसे वाटते.


त्यामुळेच गेल्या महीन्यात जेव्हा मला ऑगस्टमधील लाँग विकेंडचा अंदाज आला तेव्हा जरा मी चिंतेत पडलो कारण फक्त मलाच काही हे भाग्य लाभणार नव्हते, पण त्याबरोबरच लाखो मुंबईकरांनाही हे भाग्य लाभणार होते आणि अर्थातच
त्यातील किमान ३०% पिणार्यांनाही!! (ह्यात मी उल्लेखतो आहे, ते फक्त जे लोक पिऊन सार्वजनिक ठिकणी ऊत आणतात किंवा धिंगाणा घालतात त्यांबद्दलच. बाकी Social Drinkers नव्हेत.) आणि त्यामुळे कुठे जायचे याची आखणी करणे आणखीनच कठीण झाले होते. बऱ्याच विचारांनंतर मीच ठिकाणे ठरवली. ती अशी अलिबाग, श्रीवर्धन, हरीहरेश्वर, दिवेआगार. आणि प्रभाकर पेठकरांचा लेख वाचून त्यात रायगड, आणि शिवथर घळही ऍड केले.


झाले आमची तयारी तर जय्यत झाली होती आणि निघायची तारीखही ठरली, १२-०८-०७. सर्व प्रथम पहिला हॉल्ट अलिबागला करयचे नक्की झाले कारण तिथे आमचे स्वतःचे घर आहे हे एक आणि दूसरे असे की पाऊसाचा अंदाज घेऊन पूढचा प्रवास कसा करयचा त्याचा अंदाज बांधता येईल.

१) तिनवीरा डॅम अलिबाग.




१२ तारखेला दूपारी आम्ही अलिबागेस पोचलो, संध्याकाळी (मनोमन) परत एकदा प्रवासाची उजळणी केली, नकाशाही एकदा डोळ्याखालून घातला, कारण हा सर्व प्रवास आम्हाला दोघांनाच (मी आणि बायको) एकट्याने करायचा होता. त्यातूनही माझी बायको गुजराथी आणि तीने महाराष्ट्र एवढा पाहिलेला नाही. म्हणजे सगळी मदार माझ्यावरच होती. पण एकच प्लसपोईंट होता तो म्हणजे आमची गाडी जी मला धोका द्यायची काळजी नव्हती.


१३ ची पहाट उजाडली आणि आम्ही सकाळी ७ वाजता जय्यत तयारीनीशी अलिबागेहून निघालो श्रीवर्धनसाठी.  हे अंतर अंदाजे १२० ते १३० किमी असावे. पण आम्ही निघालोतेव्हा मला अंदाज नव्हता. अलिबागवरून via पोयनाड एक रस्ता जातो नागोठण्यापऱ्यंत अलिबाग ते नागोठणे हे अंतर अंदाजे ३५ / ४० किमी आहे. रस्ता अपेक्षेपेक्षाही चांगला होता आणि नयनरम्यही ;)

२) एक छोटासा धबधबा पोयनाड नागोठणे रस्त्याच्या अगदी-लगतच.


क्रमशः...


(मंडळी हा माझा प्रथम प्रयत्न आहे "काही लिहायचा" त्यामूळे काही चूकभूल झाली असेल तर क्षमा असावी.)