एक प्रवासवर्णन आमचेही!!! - ४

भाग - १
भाग - २
भाग - ३


ह्म्म सकाळपासून अंदाजे १२० / १३० किमी गाडी चालवली होती पण जराही शीण जाणवत नव्हता. हरिहरेश्वरला मनासारखी रहायची सोय न झाल्यामुळे आम्ही दिवेआगारला जायला निघालो. परत एकदा ४० / ५० कि.मी अंतर खराब रस्त्याने जायच्या विचार नकोसा झाला होता. म्हसळा ते दिवेआगार हे १५ किमी पण म्हसळा ते हरिहरेश्वर हे अंतर साधरण २५ किमी तरी होते पण मला कुठेतरीच राहून वेळ काढायची ईच्छा नव्हती. एक शेखाडी नावाचा रस्ता श्रीवर्धन पासून दिवेआगारपर्यंत जातो आसे एका जाणकाराने सांगितले होते, चौकशीअंती कळले की तो फारच खराब आहे, त्यामुळे परत म्हसळ्यावरूनच जायचे ठरले.


साधारणपणे ४० मिनीटात आम्ही परत म्हसळ्यास पोचलो, तेथून दिवेआगारचा रस्ता पकडला, आणि काय आश्चर्य हा रस्तातर एकदमच सुंदर होता, हिरवीगार डोलणारी शेते रस्त्याच्या दोन्ही बाजूस आणि अगदी ऐसपैसही. एकदमच खूष झालो मनातल्यामनात!! हे १५ किमी चे अंतर अक्षरशः १५ मिनिटात पार केले हात आणि नजर आता चांगलीच सरावली होती. पण समुद्राची चाहूल कुठेच लागली नाही.


बोर्ली-पंचतन पार करून अखेर दिवेआगार मधे दाखल झालो. सर्वप्रथम आता हॉटेल बघायचे ठरले. त्यानुसार २ पैकी १ आम्ही पास केले. ५०० रुपयांना ऐसपैस मोठी रूम आमच्या पदरात पडली. सामान आत ठेवले आणि आधी बिछान्यावर ऊडी मारली. साधारणपणे ३.३० वाजले होते.

वेटरकढून चहा आणि कॉफी मागवली परंतु ती काही ४.३० पर्यंत आली नाही शेवटी ती नको म्हणुन सांगितली. आणि समुद्रावर गेलो. अत्तापर्यंत मी बर्याच जणंकडून ह्या समुद्राची तारीफ ऐकली होती पण खरे सांगतो. त्याचा approach road पाहून तर मी विचार करायला लगलो की मी पुढे जावे का नाही?

काही कोळ्यांची घरे किनाऱ्याला जायच्या आधी लागली आणि त्या २ /३ घरांतून प्रत्येकी ५/६ उघडी नागडी पोरे आमच्याकडे जणू आम्ही काही Foreigner आहोत अशी पहात होती. गाडी आमची चिखलात रुतता रुतता वाचली. कडेला गाडी लावून आम्ही ती घरे पार करुन समुद्रावर गेलो. आणि आत्तापर्यंत सगळयांनी सांगितलेला अनुभव किती तंतोतंत खरा होता ते पटले.


दिवेआगार चा किनारा.










भला मोठा दिवस संपला होता. रात्रीच्या भरपेट जेवणानंतर झोप कशी लागली कळलेच नाही.  दुसऱ्या दिवशी रायगड सर करायचा होता... आणखीन कमीतकमी १०० किमी ;)