कधी उगाचच

कधी उगाचच..


कधी उगाचच आत्म्यावरचं शारिर आवरण गळून जातं


जणू वैशाख वणव्यात झाडाचं पान अकाली जळून जातं


किती भरभरून प्रेम घेऊन अलगद उतरतं पानांवर


दहिवराचं माझं मन मग मुकाट ओघळून जातं


चुकून वाट चुकलेल्या निरागस वासरासारखं


व्यवहाराच्या काटेरी दुनियेत अगदी गोंधळून जातं


वादळात पावलोपावली एक वात जपून नेताना


विझता विझताही स्वतःला हळूच सावरून जातं..


-सुप्रिया