वाटली डाळ

  • चण्याची डाळ
  • १ हिरवी मिरची ,थोडेसे आले ,कोथिंबीर,ओले खोबरे,लिंबू.
  • तेल ,मोहरी , हिंग , हळद, कडीपत्ता ,मीठ,लाल तिखट.
१५ मिनिटे
४ जण

चण्याची डाळ रात्रभर( अथवा ६-७ तास)  भिजत घालावी. यानंतर  डाळ मिक्सरवर वाटून घ्यावी(वाटताना जास्त पाणी  घालू नये.)

कढईत तेल घालून फ़ोडणी करावी.यात बारीक चिरलेली हिरवी मिरची , खिसलेले आले ,मीठ व तिखट घालावे.

यामध्ये वाटलेली डाळ घालून ती शिजवून घ्यावी.डाळ शक्य तितकी मोकळी झाली पाहिजे.

यावर  चवीप्रमाणे लिंबू पिळावे.वरून कोथिंबीर व ओले खोबरे घालावे.

**नेहमीच्या तेलाच्या प्रमाणाहून थोडे जास्त तेल  लागते . **

आई