तिला मला....-२

भोकाड पोरट्यांचे, अडचण तिला मला
मधुरात्र रंगताना व्यत्यय तिला मला

सगळी फळे तिला अन बाठे कसे मला
अन्याय्य वाटणी का असली तिला मला

ह्या तोकड्या झग्याला का लाजही नसे
डोळ्यांस शेकणारे टिपती तिला मला

वाट्यास आज येता थोडे निवांत क्षण
अंधार थेटराचा खुणवी तिला मला

फसशील खोडसाळा, आवर स्वतःस तू
हे बंध रेशमाचे,बेड्या तिला मला

आमची प्रेरणा -

तिला मला...