सध्या महाराष्ट्राला भेडसावणाऱ्या प्रमुख समस्यांचे वर्गीकरण ३ 'प' च्या सहाय्याने करता येईल.
१. पाणी
ह्यात पिण्याचे पाणी, सिंचन, धरणे, पुनर्वसन, दुष्काळ ह्या सारख्या समस्या.
२. पर्यावरण
ह्यात प्रदूषण, जंगलतोड, पर्जन्य, वाढते उष्णतामान, क्षारयुक्त जमिनी, मासेमारी ह्या सारख्या समस्या.
३. परप्रांतीय
ह्यात वाढते शहरीकरण, गुन्हेगारी, बेरोजगारी, दहशतवाद, भ्रष्टाचार, जागांचे वाढते भाव, मराठीची कोंडी, मराठी माणसांची पीछेहाट ह्या सारख्या समस्या.
ह्या बाबत तुम्हाला काय म्हणावयाचे आहे? आणखी कोणता 'प' सुचतो का?