दगडाला शेंदूर

बाळ, सांगतो ते नीट ऐक काणाडोळा करु नको


 पाटीची तू पूजा कर पण विज्ञानाची कांस सोडू नको...


दगडाला शेंदूर लाव पण बुवा-बाबाना थारा नको


देवळं तू पालथी घाल पण आश्रम मठ नको नको...


वयाचा आदर जरुर ठेव पण तर्क गहाण ठेवु नको


प्रसाद तू जरुर घे पण प्रसादाची लाथ खाऊ नको...


गणपतीचं दर्शन घे पण उन्दीर बीबीला नैवैद्य नको


गौरीची पूजा जरुर  कर सागुतीचा नैवैद्य नको...


अनिरुद्ध असो की नरेंद्र रे यातलं तर कुणी नको


 यल्लम्माला जाऊन ये पण मुरळी तिथे सोडूनको...


यंत्राचीही पूजा कर पण मॅन्युअल त्याचे टाकू नको


जन्मपत्रिका तू बनवून घे पण पोपटा प्रश्न टाकू नको...


गोग्रास तू जरुर दे पण पूजा गाईची मांडू नको


सत्पात्री दान कर तू पण भिकारी आशा लावू नको...


संगणकाची तू पूजाही कर पण चमत्कार अपेक्षू नको


योगविद्या जाणून घे तू पण विज्ञाननिष्ठा गमवू नको ...


(बाहीला नाक पुसत बाळ्या वदला, नको नको किती नको काय काय नको नि कां नको)


तर्का संगे विवेक सांगेल तर माझेही तू ऐकू नको


पण बाळा खरे सांगतो अंधश्रद्धा तू ठेऊ नको.....


समर्थ वचन ध्यानी असू कदापिही ते विसरु नको


बिकट वाट वहिवाट नसावी धोपट्मार्गा सोडू नको.....