मी सावरतो... (गजल)


मी सावरतो मला पुनः
धक्का बसतो मला पुनः!..


जरी आरसा विद्रोही
का मी बघतो मला पुनः?...


कसे मला तू अव्हेरले
मीच परखतो मला पुनः...


जुळल्या-तुटल्या नात्यांतच
मीच शोधतो मला पुनः...


तऱ्हा मनाच्या 'अजब', नि मी-
मनात हसतो मला पुनः...