मातृदिनानिमित्त

                                      आई


      जिला तुमच्याबद्दल तुमच्याहीपेक्षा अधिक माहिती आहे अशी व्यक्ती फक्त तुमची आईच असू शकते.
      आई फक्त दोनदाच सल्ला देते-तुम्हाला तो हवा असतो तेंव्हा आणि तुम्हाला तो नको असतो तेंव्हा.
      आईचा जो सल्ला तुम्ही धुडकावून लावता तो तिने दिलेला सर्वोत्तम सल्ला होता याचे प्रत्यंतर तुम्हाला आल्याशिवाय राहत नाही.
      तुम्ही विसरलात तरी पुन्हा त्याच चुका होऊ नयेत म्हणून आई तुम्हाला तुमच्या साऱ्या चुकांची सतत आठवण करून देत असते.
      तुम्ही कितीही मोठी चूक केली तरी आईच्या मनात तुमच्याविषयी आकस नसतो. हां,ती तुम्हाला त्या चुकीची वारंवार आठवण करून देते पण मनात अढी कधीच धरत नाही.
      आईशी कधीही खोटे बोलू नका आणि बोललात तरी तुमची थाप पचली या भ्रमात राहू नका.
      आईला नेहमीच कळते. कसे ते आपल्याला कळत नाही पण तिला कळतेच.
      आईकडे एखादी वस्तू नसली तरी त्या वस्तूची कृती किंवा पत्ता तिच्याजवळ नक्कीच असतो.
      जेंव्हा तुम्हाला कडकी असेल तेंव्हा आईकडे पैसे उधार मागा. तुम्ही कशाकशावर पैसे उधळले ते आठवायला ती तुम्हाला नक्कीच मदत करील.
      तुमच्याकडे करायला काही नाही हे तुमच्या आईला कधीही सांगू नका. ती नक्की तुमच्यासाठी काहीतरी काम शोधून काढील.
      आईची पद्धत ही सर्वात उत्तम पद्धत असते.विश्वास नाही बसत? विचारा तुमच्या आईला.
      तुम्ही आईला दिलेली भेट जितकी महाग तितका काळ आई ती वस्तू न वापरता जपून ठेवते.
      तुम्ही काहीही केलेत तरी आई त्याच्यावर टीका ही करणारच-अगदी तुमच्या काहीही न करण्यावरसुद्धा. 
      आई तुम्हाला जितक्या वेळा छत्री घ्यायची आठवण करते तितकी पाऊस येण्याची शक्यता जास्त असते.
      तुमची आई कितीही छोटी असली तरी ती तुमच्याहून नक्कीच मोठी असते.
      तुम्हाला पाळण्यात कुणी जोजवले होते हे कधीही विसरू नका. ती अशा गोष्टींपैकी एक आहे ज्याचे ऋण कधीही न फिटणारे आहे.
      लक्षात ठेवा तुमच्या यशामागे तुमच्या आईचे परिश्रम आहेत. तुमचे अपयश हे तुमच्या चुकीचे फळ आहे.
                                       वैशाली सामंत.
      
   ' मर्फीज् लॉ ऑन मदर्स लव्ह'  वरून.