देवा तू धाव आता,
नवसाला माझिया पाव आता..
खुर्चीवर बसले चोर भामटे,
वधारला त्यांचा भाव आता..
इन्द्रायणी तुझी मलीन झाली,
मलीन झाले गाव आता..
दुर्योधन तोच रावणही तोच,
बदलले फ़क्त नाव आता..
जखमा साऱ्या थकुन गेल्या,
थकले माझे घाव आता
'पंकजा' आक्रोश बरा नव्हे,
सत्यास कोठे वाव आता..
देवा तू धाव आता......
पंकज लालसरे