रिध्दी वल्लभा
सिध्दी वल्लभा
प्रारंभी नमितो देवा
आशिर्वच मजला द्यावा
अणूगर्भी करिसी वास
तृणदर्भी तुझी रेघ
दीनांचा तुचि नाथ
ठायी ठायी भगवंत
दिसे तोचि भाग्यवंत
तोचि खरा बुध्दिवंत
कर्माचा स्वामी मीच
स्थिर बुध्दी देई हीच
वळो माझी दृष्टी आत
माझे ठायी तुझा अंश
मोहमाया करिती दंश
दवा हो रे एकदंत
-क्षिप्रा